There are many poems pending upload on the blog, simply because when I remembered that I had to upload I didn't have my diary with me.. So get ready for a spurt of posts..
This one, I wrote for myself... Marathitla prayatna ahe.. I know it sounds very funny... But still..
लपा छपी चा खेळ सखी ग
खेळियला जो बालपणी
अजुनी त्याची ओढ तुला ग
खेळितेस तु, परी मनी।
मला न रूजला खेळ कधी तो
राज्य जमे ना मला कधी
लिंबूटिंबू चा डावच माझा
ना नवे राज्य ना नवा गडी
एकटाच तो राज्य जयाचे
लपून बसतात सवंगडी
हळू हळू तो शोधू लागतो
तेवढ्यात पाठीत धप्पा पडी :(
ठाऊक तुजला सर्व सखी ग
खेळितेस परी अंतरी
शोधीत बसते मीच तुला ग
सापडशील ना कधीतरी??
मी शोधीत असते सर्व कोपरे
लपून असलीस कुठे जरी
कधीतरी ग दिसशील मजला
झलक पुरेशी या नजरी..
आणिक जर का नाहीच दिसलीस
अश्रु येतील या नयनी
बोलावेन तुजला हाका मारून
शिव्याही घालीन मनोमनी
ठाऊक मजला सर्व सखी ग
देणार नाहीस "ओ" मजला
'रडू-बाई रडू-बाई' मनात म्हणशील
काळीजच नाही ग तुजला!
रडून-रडून मी थकून जाईन
एकाच जागा मग आठवेल
वळून पाहीन पाठी-मागे
माझी घट्ट सखी मजला सापडेल!
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
farach chan :)
Post a Comment