Friday, September 11, 2015

alipta

का रे अट्टाहास तुझा हा
- आयुष्याला हेतू असावा
कशास रे ही ओढ तुझी की
- जीवनास एक दिशा असावी

काय भले अन काय गैर हे
ठरविण्यास का उत्सुक सगळे
कोणास ठाऊक आयुष्याचे
गूढ अर्थ हे कुठे हरवले

आज इथे जर खाली उतरुनी
बोलू लागला तो दयाघना
"सर्वच आहे व्यर्थ सख्या रे
अशीच माझी मनोकामना "

काय म्हणावे अलिप्त अश्या ह्या
निर्मात्याला, कृपाकाराला
"युधिष्ठिराला जमले नाही ते
आम्हास सांगतोस करावयाला ?! "